टीपू सुलतानच्या शौर्यापुढे ब्रिटिशांनाही गुडघे टेकावे लागले - हर्ष कुमार जाधव

टीपू सुलतानच्या शौर्यापुढे ब्रिटिशांनाही गुडघे टेकावे लागले - हर्ष कुमार जाधव

भोकरदन येथे टिपू सुल्तान स्मारक समितिच्यावतीने टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली




भोकरदन प्रतिनिधी

भोकरदन येथील टिपू सुल्तान स्मारक समिती च्यावतीने २० नोव्हेंबर रोजी शनिवारी शहिद टिपू सुलतान( जन्म उत्सव)जयंती साजरी करण्यात आली,सकाळी १० वाजता टिपू सुल्तान यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी जालना रोडवरील चौकात शाहिद टिपू सुल्तान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साधेपणा ने साजरी करण्यात आली यावेळी ऍडव्होकेट हर्ष कुमार जाधव यांनी टिपू सुलतान विषयी बोलतांना सांगितले कि म्हैसूर साम्राज्याचा टिपू सुलतानच्या शौर्याच्या गोष्टी कोणाला माहिती नाही. इतिहासाच्या पानांमध्ये, टीपू सुलतानाचे वर्णन “म्हैसूरचे शेर” – म्हैसूरचा वाघ असे केले जाते. टिपू सुलतान कुशल, शूर आणि शूर नायक होता. ज्यामध्ये वीरता आणि धैर्य त्याच्या रक्तामध्येच भरलेले होते. टीपू सुलतानच्या शौर्यापुढे ब्रिटिशांनाही गुडघे टेकावे लागले होते. या व्यतिरिक्त, तो एक अत्यंत कौतुकास्पद रणनीतिकार देखील होता, टीपू सुलतान नेहमीच त्याच्या रणनीतीद्वारे त्याच्या अधीन असलेल्या प्रांत जिंकण्याचा प्रयत्न करीत असे. टीपू सुलताने ब्रिटिशांविरुद्धच्या अनेक युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.याशिवाय टीपू सुलतान हा ब्रिटिशांविरूद्धच्या लढाईतील भारताचा पहिला स्वातंत्र्य सैनिक म्हणूनही ओळखला जात आहे,यावेळी जीवरग सर,शब्बीर कुरेशी,रमेश पगारे,श्यामराव दांडगे ,महेबूब भारती, आदींनी टिपू सुलतान विषयी आपले विचार व्यक्त केले . यावेळी माजी नगराध्यक्ष हर्ष कुमार जाधव, ए पी आय तडवी साहेब, विलास शिंदे,जीवरग सर,रमेश पगारे, सोपान सपकाळ, सुरेश ताडेकर, भूषण शर्मा, जयंत जोशी,समितीचे अध्यक्ष महेबूब भारती, शेख बब्बू, मराठवाडा अध्यक्ष मा नजीर भाई, नगरसेवक कदिर बापू नगरसेवक नसीम पठाण,नगरसेवक एजाज शाह,इरफान सिद्दिकी उपाध्यक्ष नप,रमेश जाधव,संतोष अन्नदाते,विशाल गाढे,पंडित बिरसोने,योगेश आर के,मनोज बिरसोने,प्रदीप जोगदंडे ,माहिती अधिकार ताअध्यक्ष जुनेद पठाण,एजाज शाह,शब्बीर कुरेशी,शमीम बेग,शाफिक पठाण,अनिल पगारे,मुजीब कादरी,अमान खान,सलमान शहा, मुजीब हाजी,स,आरिफ, शाहिद शेख,फहिम पेंटर,शेख अमीन ,आदी समाज बांधव व मान्यवरसह सर्वपक्षीय नेते मंडळी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते,उपस्थित होते यावेळी टिपू सुल्तान स्मारक समितीचे अध्यक्ष महेबूब भारती यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले .

Post a Comment

Previous Post Next Post